मराठा आंदोलनाच्या बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जुलै 2018

कायगाव टोका येथील पूलावर जाळपोळीदरम्यान झालेल्या पळापळीत उस्मानाबाद मुख्यालयाच्या एका पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 24) दूपारी एकच्या सूमारास घडली. 

कायगाव टोका येथील पूलावर जाळपोळीदरम्यान झालेल्या पळापळीत उस्मानाबाद मुख्यालयाच्या एका पोलिसाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (ता. 24) दूपारी एकच्या सूमारास घडली. 

शाम लक्ष्मण काटगावकर असे मृत पोलिसाचे नाव आहे. कायगाव पूलावर जाळपोळ करण्यात आली. त्यानंतर बंदोबस्तावरील पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरु केली. यादरम्यान आंदोलकाच्या मागे धावताना शाम काटगावकर यांना हृदयविकाराचा धक्का बसला. यानंतर त्यांना एका प्राथमिक रुग्णालयात दाखल करुन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू, येथील डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live