हे आहे भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागचं डर्टी सिक्रेट..

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 19 जानेवारी 2019

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतलंय. पोलीस तपासात या आत्महत्येमागची काही डर्टी सिक्रेट्स समोर आली आहेत. भय्यू महाराज यांची पत्नी आयुषी हिच्या आरोपांनंतर तपासाची चक्र वेगळ्याच दिशेनं फिरली.  

अटकेत घेतलेल्या या तिघांनी पोलिस तपासात जे सांगितलं ते भय्यू महाराजांच्या आजवरच्या प्रतिमेला धुळीस मिळवणारं होतं. भय्यू महाराजांकडून लाखोने पैसे उकळल्यानंतरही ही तरुणी गप्प बसली नाही. तिने भय्यू महाराजांकडे लग्नाची अट घातली. त्यासाठी वर्षभराची मुदतही दिली. भय्यू महाराजांना हे शक्य नव्हतं. आणि याच तणावात त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं.

असा चक्रावणारा घटनाक्रम पोलिस तपासातून समोर आलाय. अद्यापही तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यामुळे या प्रकणात आणखी काय-काय उघड होईल, याचा अंदाज लावणं तूर्तास तरी कठीण आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live