VIDEO | मातेश्रीबाहेर शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं

VIDEO | मातेश्रीबाहेर शेतकरी बाप-लेकीला पोलिसांनी ताब्यात घेतलं

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री'बाहेर तक्रार देण्यासाठी तसेच शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत गाऱ्हाणे मांडण्यासाठी आलेल्या शेतकरी आणि त्यांच्या एका लहान मुलीला पोलिसांनी मातोश्रीबाहेरून ताब्यात घेतले आहे.

दरम्यान, देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्री येथे आल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. सदर शेतकरी हे कर्जाच्या विळख्यात सापडलेले होते. तसेच त्यांनी आपली समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यांची भेट होऊ शकली नव्हती. अखेरीस आज ते आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले.

दरम्यान, तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर सदर शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सोडण्याची विनंती केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस व्हॅनमध्ये बसवले. त्यानंतर संबंधित शेतकरी आणि मुलीला खेरवाडी पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, मातोश्रीवर भेटण्यासाठी अनेक लोक येत असतात. त्यामुळे त्यांना अटकाव करण्यासाठी असे वागावे लागते, असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Web Title: Police misbehavior outside of matoshree farmer father and daughter who came to see the chief minister

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com