टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरुन वादंग

राजू सोनावणेसह शिवाजी शिंदे, साम टीव्ही
बुधवार, 26 जून 2019
  • टीम इंडियाच्या भगव्या जर्सीवरुन वादंग
  • टीम इंडियाच्या भगव्या जर्सीमुळे विरोधक लालबुंद
  • खरंच भगवा रंग इतका प्रक्षोभक आहे ?

सध्या भारतात वाद घालायला आणि त्याला धार्मिक रंग द्यायला कोणतंही कारण चालतं. टीम इंडियाच्या एका जर्सीवरुन असाच एक वाद निर्माण झालाय ज्याला अकारण धार्मिक रंग दिला गेलाय. वर्ल्ड कपमध्ये ३० जूनला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया भगव्या रंगाचा जर्सी घालून मैदानात उतरतीय. खरं तर टीम इंडिया आणि इंग्लडच्या टीमचा जर्सी सारख्याच म्हणजे निळ्या रंगाचाच आहे. एकाच रंगाच्या जर्सीमुळं खेळात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणून वेगवेगळ्या रंगाचा जर्सी घालण्याचा संकेत आहे. म्हणूनच टीम इंडियानं ऑरेंज अर्थात भगव्या रंगाचा जर्सी घालून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलाय. पण नेमक्या या विषयाला विरोधकांनी धार्मिक वादाची फोडणी दिलीय.

आता समाजवादी पक्षासह काँग्रेसनंही सत्ताधारी भाजपला इतकं आयतं कोलीत दिलंय की भाजपनंही त्यांच्या राजकीय भूमिकेला साजेशी प्रतिक्रिया दिली. 

खरं तर इंग्लंड आणि टीम इंडियाची जर्सी साधारण मिळतीजुळती असल्यामुळं खेळात अडचणी नकोत म्हणून भगव्या रंगाच्या जर्सीचा वापर करण्यात येणार आहे. अवघ्या एका मॅचसाठी हा बदल आहे. पण जणू काही आभाळ कोसळलंय, टीम इंडियाची जर्सी आता कायमस्वरुपी भगवी होणार आणि आयसीसीच्या या निर्णयामागेही पंतप्रधान मोदींचंच षडयंत्र आहे अशा थाटातच विरोधकांनी आक्षेप घ्यायला सुरुवात केलीय. पण हे करताना भारताच्या तिरंग्यातही एक रंग भगवा आहे याचा मात्र विरोधकांना विसर पडलाय.

WebTitle : marathi news political chaos due to orange jersey of team India against england  

 


संबंधित बातम्या

Saam TV Live