मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; अंगावर ओतलं रॉकेल

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. अंगावर ओतलं रॉकेल, सहाय्यक कृषी अधिकारी पदाच्या परिक्षेचा निकाल लागत नसल्याने, हताश तरुणाने उचललं पाऊल 

मंत्रालयासमोर तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. अंगावर ओतलं रॉकेल, सहाय्यक कृषी अधिकारी पदाच्या परिक्षेचा निकाल लागत नसल्याने, हताश तरुणाने उचललं पाऊल 

मंत्रालयाच्या गार्डन गेटसमोर एका व्यक्तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे... अविनाश शेटे असं तरुणाचं नाव असून, त्याने अंगावर रॉकेल ओतून स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला.... 25 वर्षीय अविनाश हा अहमदनगरचा रहिवासी असून... त्याने सहाय्यक कृषी अधिकारी पदासाठी परीक्षा दिली होती... मात्र त्याबाबत कोणताही निर्णय न झाल्याने त्याला वारंवार मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या... सतत मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवूनही काम होत नसल्याने अखेरीस अविनाशने आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला... 
 
संबंधित बातम्या

Saam TV Live