राजकीय नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी, कोण कोणाबद्दल काय म्हणतंय पाहा एका क्लिकवर...

साम टीव्ही न्यूज
गुरुवार, 17 ऑक्टोबर 2019

1. भाजपचे उमेदवार नाना श्यामकुळे यांच्यासाठी सुधीर मुनगंटीवारांची प्रचारसभा, चंद्रपुरातल्या सभेत शहराचा विकास करणार असल्याचं आश्वासन, तर विरोधकांवर टीकांचे झोड..

2. भिमराव केराम यांना निवडून द्या, मी किनवटचं पालकत्व स्वीकारतो...नांदेडमधील प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांची ग्वाही... किनवट इथल्या आदिवासी भागाचा विकास झाला नसल्याचंही केलं मान्य...

3. युतीचा धर्म आम्हाला कुणी शिकवू नये, शिवसेना खासदार संजय राऊत यांचा नितेश राणेंना सणसणीत टोला... 

4. पालघरमध्ये काँग्रेसला आणखी एक धक्का, काँग्रेसचे माजी मंत्री शंकर नम यांचे चिरंजीव आणि पालघर मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार योगेश नम यांचे ज्येष्ठ बंधू सुधीर नम यांचा शिवसेनेत प्रवेश..

5. रत्नागिरीतले राष्ट्रवादीचे उमेदवार शेखर निकम यांना कुणबी समाजाचा पाठिंबा, युती सरकारने कुणबी समाजाला वंचित ठेवल्याची टीका...   

6. श्रीगोंद्यातल्या सभेत शरद पवारांची माजी मंत्री बबनराव पाचपुतेंवर जोरदार टीका, 13 वर्ष मंत्रिपद मिळूनही कामं न केल्याचा आरोप करत बांगड्या भरण्याचा दिला सल्ला..

7. भाजप हे मस्तावलेले सरकार, पिंपरीतील सभेत प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर निशाणा, या सरकारला लगाम लगावण्याची गरज असल्याचंही केलं वक्तव्य.... 

8. पृथ्वीराज चव्हाणांना यंदा घरातली मतंही पडतील का याबाबत शंका, उदयनराजे भोसलेंची खोचक टीका....

9. महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारे अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्यावर गुन्हा दाखल, तर राऊतांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ संतप्त महिलांकडून आज मोर्चाचं आयोजन..

10. काँग्रेसच्या प्रचारासाठी शत्रुघ्न सिन्हा यांची सोलापुरात हजेरी, सभेतली गर्दी पाहून काँग्रेसचाच विजय होईल, असा व्यक्त केला विश्वास.. 

11. भंडारा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार नरेंद्र भोंडेकर यांचा हटके प्रचार, ट्रॅक्टर चालवून केलं मतदानाचं आवाहन... 

12. धुळे जिल्ह्यात अपक्ष उमेदवारांच्या हातात सत्तेची चावी, पक्षांनी डावलल्यामुळे दिग्गजांनी अपक्ष उमेदवारी लढवण्याचा केला निर्धार, पाच मतदार संघापैकी चार मतदारसंघात सर्वच पक्षांची डोकेदुखी वाढली..

13. बुलडाण्यात अपक्ष उमेदवाराच्या बॅनरवर पंतप्रधान मोदी आणि खडसेंचा फोटो लावल्याने संभ्रम, अपक्ष उमेदवार योगेंद्र गोडे यांच्याविरोधात तक्रार दाखल...

Web Title - political statements on each other

संबंधित बातम्या

Saam TV Live