राज ठाकरे, अजित पवार, आदित्य ठाकरे, दिवाकर रावते, सलमान खान यांनी वाहतुकीचे नियम मोडून  थकवला दंड

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांच्या घरी ई-चलन पाठवून दंड वसूल करण्याचे निर्देश दिले जातात. पण असेही अनेक जण आहेत ज्यांना ई-चलन आल्यानंतरही ते दंड भरत नाहीत. या यादीतल्या लोकांची नावं ऐकलीत तर तुम्हाला धक्का बसेल. या यादीत कुणा सामान्य लोकांची नावं नाहीत. राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादीचे नेते  अजित पवार, अभिनेता सलमान खान, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर अशा अनेकांची नावं या यादीत आहेत. 

वाहतुकीचे नियम मोडून दंड थकवणाऱ्या नेत्यांची आणि अभिनेत्यांची यादी खूप मोठी आहे. वाहतूक विभागानं नियम मोडणाऱ्यांना ई-चलन पाठवलय. त्यांच्याकडून 119 कोटींचा दंड वसूल केला जाणारंय. 

दरम्यान आदित्य ठाकरे आणि दिवाकर रावतेंनी नियमांचं उल्लंघन केलेलं नसून त्यांना ई चलन आलं नसल्याचा दावा शिवसेना नेत्यांनी केलाय. तर आपण आपली गाडी केव्हाच विकली असल्याचा दावा भाजप आमदार राम कदम यांनी केलाय. सलमानच्या कुटुंबियांनीही ई-चलन मिळालं नसल्याचं म्हंटलंय. तर राज ठाकरेंच्या वतीनं कोणताही खुलासा झालेला नाही. आता वाहतूक विभाग नियम मोडणाऱ्यांकडून 119 कोटींचा दंड कशाप्रकारे वसूल करते हे पाहणं महत्वाचं ठरणारंय. 

कोणावर किती दंड?

राज ठाकरे  – 28 फेब्रुवारी 2017 - फॅन्सी नंबरप्लेटसाठी 1 हजाराचा दंड
झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु. चा दंड, एकूण 1 हजार 200 रूपये 

आदित्य ठाकरे -10 डिसेंबर 2016 - झेब्रा क्रॉसिंगला गाडी न थांबवल्याने 200 रु. चा दंड
8 जानेवारी 2018 – वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
23 जानेवारी 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
11 मार्च 2018 वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
29 एप्रिल 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
1 मे 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन – 1 हजाराचा दंड
3 मे 2018 - वेग मर्यादेचं उल्लंघन– 1 हजाराचा दंड
एकूण – 6 हजार 200 रूपये

दिवाकर रावते, परिवहन मंत्री -
वेग मर्यादेचं उल्लंघन- 1 हजार रुपये
ही गाडी दिवाकर रावते यांचा मुलगा उमेशची आहे.

अरबाज खान प्रोडक्शन
23 जानेवारी 2018 – वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड
10 मे 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड,
31 मे 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड,
21 जुलै 2018 - वेग मर्यादा न पाळणे – 1 हजाराचा दंड
एकूण – 4 हजार रुपये
 
संबंधित बातम्या

Saam TV Live