पवारांची कौटुंबिक बैठक सुरु; 19 तासांनंतर अजित पवार आले समोर

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

मुंबई : तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर दिसले आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते पोहचले असून, त्यांची कुटुंबियांसोबत बैठक सुरु झाली आहे.

मुंबई : तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर बेपत्ता असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आज (शनिवार) तब्बल 19 तासांनंतर दिसले आहेत. शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी ते पोहचले असून, त्यांची कुटुंबियांसोबत बैठक सुरु झाली आहे.

अजित पवार हे नेमके कुठे गेले आहेत, याची कोणालाही माहिती नव्हती. अखेर आज दुपारी एकच्या सुमारास धनंजय मुंडेंसह अजित पवार सिल्व्हर ओक येथे पोहचले. यापूर्वी त्यांचे भाऊ श्रीनिवास पवारही येथे पोहचले होते. शरद पवार पुण्याहून मुंबईत पोहचल्यानंतर या सर्व घडामोडींना वेग आला आहे. धनंजय मुंडे तेथून निघताना माध्यमांना योग्यवेळी सर्व माहिती दिली जाईल असे सांगितले. 

 

 

 

आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अजित पवार हे कोठे आहेत याच्याच चर्चा सुरु होत्या. ते पुण्यातील निवासस्थानीही नाहीत आणि मुंबईतही पोहचलेले नाहीत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आले होते. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे एकत्र होते की काय अशीही चर्चा सुरु होती. शुक्रवारी रात्री अजित पवार नगरच्या कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर असल्याची माहिती मिळत होती. अजित पवार दुपारी बारामती आणि पुण्याच्या परिसरात होते. सायंकाळी ते अंबालिका कारखान्यावर गेले. याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती, असं सांगण्यात येत होते. पण, ते तेथेही नव्हते. अखेर 19 तासांनंतर ते सर्वांसमोर आले आहेत


संबंधित बातम्या

Saam TV Live