अमित शहांच्या मिशन काश्मिरमुळे फुटीरतावाद्यांची तंतरली

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 26 जून 2019

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जम्मू काश्मिरच्या दौऱ्यावर आहेत. गृहमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर अमित शहांचा हा पहिलाच काश्मिर दौरा आहे. जम्मू काश्मिरातील सुरक्षा तसंच विकासकामांचा आढावा असा कार्यक्रम अमित शहांच्या दौऱ्यात निश्चित करण्यात आलाय. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसंबंधीही अमित शहा स्वत: आढावा घेतायंत.

काहीच दिवसांपूर्वी फुटीरतावाद्यांच्या कोणत्याही अटी मान्य होणार नाहीत, त्यांच्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, अशी ठोस भूमिका अमित शहांनी घेतली. आता तर आज पर्यंत जे होतं आलं, ते आता होणार नाही, अशा शब्दातच अमित शहांनी फुटीरतावाद्यांना फटकारलंय. त्यातच आखण्यात आलेल्या अमित शहांच्या २ दिवसीय काश्मिर दौऱ्यामुळं फुटीरतावाद्यांची तंतरलीय. हुरियत कॉन्फरन्ससारख्या फुटीरतावाद्यांनी अमित शहांचा इतका धसका घेतलाय की शहांशी चर्चा करण्यासाठी हुरियत नेत्यांनी जेलमधून प्रयत्न सुरु केलेत.

फुटीरतावाद्यांची हरतऱ्हेनं कोंडी करतानाच दौऱ्यादरम्यान अमित शहा शहीद जवानांच्या कुटुंबियांची भेट घेतआहेत, तसंच पंचायत सदस्यांशी चर्चाही करतायंत. अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेबद्दल तर अमित शहांनी स्वत: जातीनं लक्ष घातलंय. एकंदरीतच मिशन काश्मिरसाठी अमित शहांनी पूर्ण जोर लावलाय. आता अमित शहांच्या काश्मिर दौऱ्याचं फलित काय हे आगामी काळात समजेलच.

WebTitle : marathi news politics amit shah mission kashmir separatist under tension   

संबंधित बातम्या

Saam TV Live