पाचव्या दिवशीही अण्णा आनोलानावर ठाम; सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची घेणार भेट

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 27 मार्च 2018

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस आहे... रामलीला मैदानावर अनेक शेतकऱ्यांसह ते उपोषणाला ते बसलेत. सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची भेट घेणार आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पण निवडणुक सुधारणेच्या मागण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. दरम्यान याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी फोनवरुन चर्चा केली.

जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल असा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. आज अण्णा हजारे यांच्या उपोषणाचा 5 वा दिवस आहे... रामलीला मैदानावर अनेक शेतकऱ्यांसह ते उपोषणाला ते बसलेत. सरकारचं शिष्टमंडळ पुन्हा एकदा अण्णांची भेट घेणार आहे. लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी सरकार सकारात्मक आहे. पण निवडणुक सुधारणेच्या मागण्यासाठी वेळ लागणार आहे. त्यामुळे आज काय निर्णय होतो याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे. दरम्यान याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी फोनवरुन चर्चा केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी, अण्णा मंगळवारी उपोषण सोडतील असा विश्वास व्यक्त केलाय.


संबंधित बातम्या

Saam TV Live