उद्यापर्यंत अण्णा आपलं उपोषण मागे घेतील -  गिरीश महाजन

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 26 मार्च 2018

राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रामलीला मैदानात जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली. आंदोलनाबाबत महाजन यांनी अण्णांशी चर्चा केलीय. अण्णांबरोबर सकारात्मक चर्चा झाल्याचं गिरिश महाजन यांनी सांगितलंय. त्याचबरोबर अण्णांच्या मागण्यांबाबत सरकारही सकारात्मक असल्याचं त्यांनी सांगितलंय. नितिन गडकरींची भेट घेतल्यानंतर गिरिश महाजन चर्चेसाठी अण्णांकडे पोहचले होते. उद्यापर्यंत अण्णा आपलं उपोषण मागे घेतील असा विश्वासही गिरीश महाजनांनी व्यक्त केलाय. 

आश्वासनं नको, निर्णय घ्या
जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिला असा इशारा अण्णा हजारेंनी दिलाय. मुख्यमंत्र्यांचा मला फोन आला होता. मात्र केवळ आश्वासनं नको, निर्णय घ्या. असा निरोप मी मुख्यमंत्र्यांन दिलाय असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलंय. सरकार किती दिवसात आश्वासन पूर्ण करा हे देखील स्पष्ट करा असं अण्णांनी म्हंटलंय.

संबंधित बातम्या

Saam TV Live