'अमित शहा यांना कॉंग्रेसमुक्त भारत नाही मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे' - असदुद्दीन ओवेसी 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

हैदराबाद : विधानसभा निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये 'एमआयएम'चे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. 'अमित शहा यांना कॉंग्रेसमुक्त भारत नको आहे.. त्यांना मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे', असा आरोप त्यांनी केला. 

तेलंगणामध्ये निवडणुकीचे वातावरण तापले आहे. काल (बुधवार) झालेल्या प्रचारसभेत ओवेसी यांनी भाजपवर कठोर शब्दांत टीका केली. 'अमित शहा 'एमआयएम' मुक्तीची भाषा बोलत आहेत. पण त्यांना देशातूनच मुस्लिमांना पळवून लावायचे आहे. त्यांना कॉंग्रेसमुक्त नव्हे, मुस्लिम मुक्त भारत करायचा आहे. पण असे होणार नाही. मुस्लिमांना या देशाच्या राज्यघटनेने अधिकार दिला आहे', असे ओवेसी म्हणाले. 

'तेलंगणामध्ये कोणत्याही प्रकारे पाय रोवण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण त्यांना यश येणार नाही. तेलगू देसमने कॉंग्रेसशी आघाडी केली आहे. पण त्यांचेही इथे काय काम आहे? आंध्र प्रदेशमध्ये बसून तेलगू देसम आता तेलंगणा चालवू पाहत आहे का? तेलंगणाचे निर्णय दिल्लीतून कॉंग्रेस घेणार की नागपूरहून भाजप घेणार? अजिबात नाही', अशा शब्दांत ओवेसी यांनी प्रचारसभेत विरोधी पक्षांवर टीका केली. 

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा विभक्त झाल्यानंतर या राज्यात प्रथमच विधानसभा निवडणूक होत आहे. सध्या या राज्याची सत्ता टीआरएसकडे आहे.

WebTitle : marathi news politics Asaduddin Owaisi on amit shah and his political ideology 

संबंधित बातम्या

Saam TV Live