काँग्रेसच्या एका पोस्टरवर राहुल गांधी 'राम'; तर पंतप्रधान मोदी 'रावण' !

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 8 फेब्रुवारी 2019

देशात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीमुळे वातावरण तापले आहे. राम मंदिराचा विषय चर्चेत आहे. अशातच भोपाळमध्ये काँग्रेसच्या एका पोस्टरवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे भगवान राम तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रावणाच्या वेषात दाखवण्यात आले आहेत. 

राम रुपी राहुल मोदी रुपी रावणावर शरसंधान करत असल्याचे दाखवल्याने दोन्ही पक्षांमध्ये महाभारत रंगलं आहे. "चोरांनो तुमचे काही खरे नाही, आम्ही राम भक्त आहोत, चोरांखेरीज आमचे कुणाशी वैर नाही", असा संदेश या पोस्टरवरून देण्यात आलेला आहे. 

तसंच पोस्टरवर राफेल दाखवण्यात आले असून 'चौकीदार चोर है' असंही लिहिण्यात आले आहे. भोपाळमध्ये लावण्यात आलेल्या काँग्रेसच्या या पोस्टरवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला असून ते हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

WebTitle : marathi news politics banner by congress depict modi as ravana and rahul gandhi as lord rama 

संबंधित बातम्या

Saam TV Live