मतदारांना आकर्षित करण्यासाठी भगवतगीतेचं कार्ड ?

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 12 जुलै 2018

आगामी निवडणुकांसाठी भाजपने आतापासून कंबर कसली असून देशात राम कार्ड आणि राज्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भगवतगीतेचं  कार्ड खेळल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

मुंबई शहर आणि उपनगरातील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना, आपल्या महाविद्यालयात भगवतगीतेचे वाटप करण्याचे आदेश, राज्य सरकारने दिले आहेत. राज्य शासनाच्या उच्च शिक्षण, मुंबई विभागातर्फे तसं पत्र महाविद्यालयांना देण्यात आलंय. यानूसार नॅक मुल्यांकित अ/अ+ प्राप्त श्रेणी महाविद्यालयांना 100 भगवतगीतेचे संच वाटप करण्यास सांगितले आहे. त्यासाठी या सर्व महाविद्यालयांनी मुंबई विभागाच्या उच्च शिक्षण, सहसंचालक कार्यालयातून भगवतगीतेचे संच घेऊन जावे आणि त्याचे वाटप केल्यानंतर त्याची पावती सादर करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

आगामी निवडणुकांसाठी भाजपने आतापासून कंबर कसली असून देशात राम कार्ड आणि राज्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी भगवतगीतेचे कार्ड खेळल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

 


संबंधित बातम्या

Saam TV Live