निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा घरोघरी पोचण्याचा भाजपचा इरादा

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

पुणे - भाजपने आगामी निवडणुका जिंकण्यासाठी आता ‘मेरा घर, भाजप का घर’ची नवी मोहीम आखली आहे. या मोहिमेत आम्हाला मतदान कराच, पण तुमच्या घराच्या छतावर भाजपचा झेंडाही फडकवा, असे आवाहन करीत, निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा घरोघरी पोचण्याचा भाजपचा इरादा आहे. येत्या मार्च महिन्यात सुरू होणारी ही मोहीम फत्ते करण्यासाठी भाजपने वरिष्ठ नेत्यांची फौज उभारली आहे. 

गेल्या महिन्यांत हिंदी पट्ट्यातील राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकांत पक्षाची पिछेहाट झाली. त्यामुळे भाजपने आपली वोटबॅंक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यातून ही मोहीम आखली आहे. यानिमित्ताने निवडणुकीचे वातावरण निर्माण केले जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुण्यात सांगितले.

राममंदिरासाठी सरकार प्रयत्नशील
राममंदिर उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे जावडेकर यांनी सांगितले. रावसाहेब दानवे आणि संजय काकडे यांच्यातील वादाच्या पार्श्‍वभूमीवर जावडेकर म्हणाले, की मी अशा विषयांवर बोलत नाही.

Web Title:  marathi news politics BJP's intention to reach each and every home before election 

संबंधित बातम्या

Saam TV Live