जम्मू-काश्मीरमधल्या हिंदूंसाठी भाजपचा मास्टर प्लॅन 

राजू सोनावणेसह ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही मुंबई 
शनिवार, 13 जुलै 2019

काश्मिरी पंडितांचा मुद्दा देशाच्या राजकारणात कायम चर्चेत राहिलाय. काश्मीरी पंडितांचं पुनर्वसन व्हावं यासाठी केंद्र सरकारनं एक मास्टर प्लॅन आखलाय. या प्लान नुसार 1989 च्या दहशवादी कारवायांमुळे विस्थापित झालेल्या काश्मिरी पंडितांचं पुन्हा काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.

सरकारनं निर्णयाची अंमलबजावणी केली तर 2 ते 3 लाख काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीर खोऱ्यात वास्तव्यास येतील. मात्र सरकारच्या या भूमिकेला जम्मू-काश्मीरमध्ये तीव्र विरोध होण्याची शक्यताही आहे. 

मोदी सरकार 1 च्या कार्यकाळात जम्मू-काश्मीरमध्ये विस्थापित हिंदूंसाठी वेगळी कॉलनी तयार करण्याचा विचार होता. मात्र या प्रस्तावाला गती मिळाली नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यादिशेनं हालचाली सुरू झाल्या आहेत.

काश्मिरमधील नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीच्या नेत्यांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे. या नेत्यांनी हिंदूंच्या घरवापसीचं समर्थन केलंय मात्र त्यांच्यासाठी वेगळी कॉलनी बनवली जाणार असेल तर ते सहन केलं जाणार नाही असा पवित्रा या नेत्यांनी घेतलाय.

या सर्व घडामोडींमुळे काश्मीर खोऱ्यातलं वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. 

WebTitle : marathi news politics bjps masterplan for kashmiri pandits  

संबंधित बातम्या

Saam TV Live