शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह काय हवंय पाहा.. भाजपचा मात्र सावध पवित्रा!

अमोल कविटकर
गुरुवार, 16 मे 2019

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना-भाजप युती झाली. युतीत शिवसेनेला एक जागा वाढवून देण्यात आली तर विधानसभा निवडणुकीत  निम्या-निम्या जागा लढवण्यावर दोन्ही पक्षांचे एकमत झालं. अमित शहा आणि उद्धव ठाकरेंनी तशी घोषणाही केली. मात्र आता शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदाप्रमाणेच राज्यात सत्तेतील वाटा वाढवून हवाय. यासंदर्भात भाजपने मात्र सावध पवित्रा घेतलाय.

सुत्रांच्या माहितीनुसार केंद्रात २७२चा जादूई आकडा गाठण्याकरिता शिवसेनेची गरज भासल्यास शिवसेनेची मागणी भाजप मान्य करेल पण शिवसेनेची गरज नसल्यास एखाद्या मंत्रिपदावर शिवसेनेची बोळवण केली जाण्याची शक्यता आहे.

उघड आहे शिवसेनेची उपमुख्यमंत्रिपदासह सत्तेत वाढीव वाट्याची इच्छा 23 मे नंतर पुर्ण होणार आहे. मात्र, ती ही लोकसभा निवडणुकीच्या निकालावरच अबलंबून असणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live