पूरपरिस्थितीचं राजकारण करू नका; सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे - देवेंद्र फडणवीस

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

सांगली : कोल्हापूर आणि सांगलीमध्ये निर्माण झालेल्या पुरस्थितीचे राजकारण करू नका. सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे, असे आवाह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सांगलीतील पुरस्थितीची मुख्यमंत्र्यांनी आज पाहणी केली. यावेळी त्यांनी मदतकार्यातील अधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन समस्या जाणून घेतल्या. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी पुरस्थिती आणि मदतीविषयी माहिती दिली.

मुख्यमंत्री म्हणाले :

 • मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांच्या मदतीची घोषणा 
 • पूरग्रस्तांना आतापर्यंत 153 कोटींची मदत
 • काही मदत कॅश, तर काही मदत ऑनलाईनच्या माध्यमातून
 • नेव्ही आणि एनडीआरएफद्वारे मदत
 • मुसळधार पाऊस आणि कोयनेतील विसर्गामुळे पुरस्थिती
 • 9 दिवसांमध्ये कोयना धरण 50 टक्के भरले
 • अनेक राज्यांतून बचाव पथके महाराष्ट्रात आली आहेत
 • हवामानातल्या बदलासाठी आपल्याला तयार राहावे लागेल
 • शिरोळ तालुक्यात अद्याप काही जण अडकून पडले आहेत
 • 101 गावांतून 28 हजार 528 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले
 • मदतीसाठी दोन दिवस घरात पाण्याची अट शिथिल
 • वीज, पाणीपुरवठा सुरळीत करण्यावर भर
 • गिरीश महाजन आणि सर्व मंत्री लोकांमध्ये गेल्याने पुरग्रस्तांना दिलासा मिळाला
 • गिरीश महाजनांनी सेल्फी काढला नाही
 • मृत जनावरांची तात्काळ विल्हेवाट लावली जाईल
 • 306 छावण्यांमध्ये नागरिकांना ठेवण्यात आले आहे
 • 27 हजार हेक्टरवरील पिके नष्ट
 • स्वच्छतेसाठी अधिक कुमक देण्यात येईल
 • 48 तासांत या भागातील थोडे ओसरेल, पण पूर्ण पाणी ओसरण्यासाठी 72 तास लागतील
 • पावसाचा अंदाज कोणालाच आला नाही

WebTitle : marathi news politics cm devendra fadanavis on sangali and kolhapur flood 

संबंधित बातम्या

Saam TV Live