Shivsena आणि MNS संबंधी 3 महत्त्वाच्या बातम्या

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 11 फेब्रुवारी 2019

राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. या बैठकीत आगामी निवडणुकीबाबत रणनिती ठरवण्यात येणार आहे. या निवडणुकीत मनसे मुंबईतील ३ जागा लढवण्याची शक्यता आहे. याचसंदर्भात या बैठकीत घोषणा होणार आहे..

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व 48 जागांसाठी चाचपणी सुरू

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून सर्व 48 जागांसाठी चाचपणी सुरू झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वत: मतदारसंघनिहाय शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. या बैठकीत युती झाल्यास इशान्य मुंबई मतदारसंघातून सोमय्या नको, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. तसंच  शिवसेनेचा सन्मान हा ठेवलाच पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितल्याची माहिती आहे.

सामनातून मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर निशाणा

शिवसेनेच्या मुखपत्रातून पुन्हा एकदा मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधण्यात आलाय. राजकारण करणाऱ्या प्रत्येकाला सत्ता हवी. पण, त्याच नशेत राहून झिंगल्यासारखे बोलणे बरं नसल्याची टीका शिवसेनेने केली. तसंच, यालापाडू-त्यालापाडू असे सध्या सुरू आहे. याच, धुंदीत उद्या हे स्वतःच कोसळतील, तरीही यांचा गिरे तो भी टांग उपर या पद्धतीने कारभार सुरूच राहील. अशीही टीका करण्यात आली.

WebTitle : marathi news politics important happening related to mns and shivsena 

संबंधित बातम्या

Saam TV Live