एककल्ली कारभार सोडून मोदी घेणार सर्वसमावेशक भुमिका

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 17 जून 2019

आपल्या पहिल्या कार्यकाळात विरोधकांना कस्पटासमान लेखणाऱ्या प्रधानसेवकांनी दुसऱ्यांदा सत्तेवर आल्यानंतर विरोधी पक्षाला सन्मानाची वागणूक देण्याचे संकेत दिले आहेत. पावसाळी अधिवेशनाला सामोरं जाताना माध्यमांशी साधलेल्या संवादात मोदींनी संसदीय कामकाजात विरोधी आवाजाचं महत्व अधोरेखित केलं. 

गतवेळेप्रमाणे यावेळीही अपुऱ्या संख्येबळाअभावी काँग्रेसला लोकसभेतल्या विरोधी पक्षनेते पदापासून वंचित रहावं लागण्याची चिन्हं आहेत. विरोधी पक्षनेतेपद प्राप्त करण्यासाठी विरोधकांमधील सर्वात मोठ्या पक्षाला एकूण सदस्यसंख्येच्या दहा टक्के सदस्य निवडून आणावे लागतात. यंदाच्या लोकसभेची सदस्यसंख्या 543 असून विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी 54 सदस्यांची गरज आहे. अवघे 52 सदस्य असल्याने आपण विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार नसल्याचं काँग्रेसने जाहिर केलं होतं. 

मात्र मोदींच्या या वक्तव्याने काँग्रेसच्या आशा पल्लवित झाल्यायत. याशिवाय आगामी काळात आपल्या सरकारची भुमिका सर्वसमावेशक असेल, असंही मोदींनी आपल्या मनोगतात म्हटलंय. आपल्या पहिल्या कार्यकाळातील चुका टाळत, एककल्ली कारभार सोडून मोदी जर सर्वसमावेशक भुमिका घेत असतील तर ही बाब निश्चितच स्वागतार्ह आहे.

WebTitle : marathi news politics of india narendra modi on space of opposition leader

संबंधित बातम्या

Saam TV Live