हनुमान चालिसा म्हटल्यानं इशरत जहाँना धमकी

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 19 जुलै 2019
  • हनुमान चालिसा म्हटल्यानं इशरत जहाँना धमकी
  • शेकडोंच्या जमावानं घेरुन धमकवल्याची तक्रार
  • हिंदूंच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यानं धमकी ?

भाजपा सदस्य इशरत जहाँ यांना समाजकंटकांकडून धमकी देण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयात तिहेरी तलाक प्रकरणी याचिका दाखल केल्याप्रकरणी  भाजपा सदस्य इशरत जहाँ यांना समाजकंटकांकडून धमकी देण्यात आलीय धमकी देण्यात आलीय. 

धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाल्यानं आपल्या पतीचा भाऊ आणि घरमालक धमकावत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. भाजप समर्थकांनी हावडा इथल्या एसी मार्केटमध्ये आयोजित केलेल्या ‘हनुमान चालिसा पाठ’ कार्यक्रमात जहाँ यांनी सहभाग घेतला होता. त्यानंतर मुलाला शाळेतून घेऊन घरी जात असताना जवळपास १०० लोकांनी आपल्याला घेरलं, हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यावरुन धमकावलं असा आरोप जहाँ यांनी केलाय. 

दरम्यान, यासंबंधी इशरत जहाँ यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीय. अनेक महिन्यांपासून पश्चिम बंगालमध्ये धार्मिक, धर्मांध राजकारण चांगलंच रंगताना दिसतंय. त्यातच आता आणखी एका घटनेची भर पडलीय.

WebTitle : marathi news politics ishrat jahan threatened because she took part hanuman chalisa reading 

 


संबंधित बातम्या

Saam TV Live