"महाराष्ट्र पेटवणार, परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार" - जितेंद्र आव्हाड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 28 जानेवारी 2019

मुंबई - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना जाहीर झालेल्या पद्मविभूषण पुरस्काराला विरोध दर्शविला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे, की "महाराष्ट्र पेटवणार... परत एकदा शिवसन्मान परिषदा घेणार" बं. मो. पुरंदरेंना सन्मानित करून शिवप्रेमींच्या जखमांना मीठ चोळले. जितेंद्र आव्हाड यांनी ट्‌विटरवर आपला एक व्हिडिओही शेअर केला आहे. 

त्यात ते म्हणतात, की "महाराष्ट्रभूषण' दिला तेव्हाही आम्ही हेच सांगत होतो. ज्यांनी जिजाऊंची, छत्रपतींची बदनामी केली, त्यांना का मोठे करताय? जेम्स लेन म्हणजेच बाबासाहेब पुरंदरे. दर दोन- चार वर्षांनी तुम्ही महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण करणाऱ्या पुरंदरेंना परत पडद्यावर आणत असाल, पुरस्काराने गौरविणार असाल, तर हे पुरस्कार कशा माध्यमातून दिले जात आहेत, याबाबत सर्वसामान्यांचा मनात शंका निर्माण होत आहे. आम्ही महाराष्ट्रात वैचारिक आग लावणार.'

Web Title: Maharashtra will continue to patronize...Shiv Sena convention will be held once again - Jitendra Awhad

संबंधित बातम्या

Saam TV Live