राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच.. 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 7 जून 2019

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय. मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिलीय.

गिरीश बापट हे खासदार म्हणून निवडून गेलेत. गिरीश बापट यांनी आमदारकीचा आणि त्यांच्याकडील मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय. यामुळं त्यांच्याकडील अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचा कार्यभार जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आलाय.

तर विनोद तावडे यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रिपद सोपविण्यात आलंय. याशिवाय पुण्याचं पालकमंत्रीपद चंद्रकात पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलंय. तर गिरीश महाजन यांच्याकडे जळगावचं पालकमंत्रीपद सोपविण्यात आलंय.    

संबंधित बातम्या

Saam TV Live