15 लाख का क्या हुआ, जुमलेबाजी बंद करो'

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - 'जुमलेबाजी बंद करो', 'क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ' या घोषणांनी आज (बुधवार) लोकसभेचे दणाणून गेले. निमित्त होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचे.

लोकसभेत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या भाषणावर उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसने देशाचे तुक़डे केले असा आरोप त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्ष काँग्रेसचे खासदार आणि तेलगू देसम पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. अर्थसंकल्पात आंध्र प्रदेशला निधी न देण्यात आल्याने टीडीपीच्या खासदारांनी जोरदार गदारोळ केला.

'झुठे आश्वासन बंद करो', 'झुठा भाषण बंद करो' या घोषणा सुरु असताना मोदींचे भाषण सुरु होते. मोदींनी आतापर्यंत दिलेल्या आश्वासनांवरून विरोधी पक्षांकडून त्यांना लक्ष्य करण्यात आले. जोरदार घोषणाबाजीतच मोदींनी आपले भाषण पूर्ण केले.

संबंधित बातम्या

Saam TV Live