''कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं राफेल डील केलं नाही'' - निर्मला सीतारमन 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 4 जानेवारी 2019

राफेल विमान करारावरून राजकारण चांगलेच तापत आहे. काँग्रेसकडून मोदी सरकारवर सातत्याने टीका केली जात आहे.  त्यानंतर आता संरक्षणमंत्री निर्मला सीतारमन यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ''कमिशन मिळालं नाही म्हणून काँग्रेसनं राफेल डील केलं नाही''. तसेच व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचे कंत्राट एचएएलला का दिले नाही? असा सवालही त्यांनी यावेळी काँग्रेसला केला.

राफेल कराराच्या मुद्यावर लोकसभेत आज (शुक्रवार) सीतारमन बोलत होत्या. राफेल करारासाठी अनिल अंबानी यांच्या कंपनीची निवड का केली गेली? राफेल विमानाच्या निर्मितीचे कंत्राट एचएएला कंपनीला का देण्यात आले नाही? यांसारखे प्रश्न काँग्रेसकडून वारंवार केले जात आहेत. त्यावर आज सीतारमन यांनी काँग्रेसच्या प्रश्नांनाच प्रतिप्रश्न केला. त्या म्हणाल्या, ''व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टरचे कंत्राट तुम्ही एचएएलला का दिले नाही? एचएएलकडून तुम्हाला काही मिळणार नाही हे माहीत होते आणि ऑगस्टा वेस्टलँडकडून ते मिळाले. त्यामुळे तुम्ही एचएएलऐवजी ऑगस्टा वेस्टलँडची निवड केली''. 

दरम्यान, सीतारमन यांनी आम्ही डिफेन्स डील करतो. डिफेन्समध्ये डिलिंग करत नाही, असेही सांगितले.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live