नोटबंदी फसवी.. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली? - राहुल गांधी

नोटबंदी फसवी.. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली? - राहुल गांधी

नोटाबंदी आणि राफेलच्या मुद्यावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केलीय. मोदींची नोटबंदी फसवी होती हे आता उघड झालंय असं सांगत या सरकारनं सामान्यांचा पैसा उद्योगपतींवर उधऴला असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. नोटबंदीच्या माध्यमातून सरकारनं काळ्या पैशांचे पांढरे पैसे केले असा आरोपही राहुल गांधींनी केलाय. राफेल करारवरून मोदी आणि अंबानींमध्ये नेमकं कोणतं डील झालं? असा सवालही राहुल गांधींनी विचारलाय. 

राफेल करारावरुनही राहुल गांधींनी भाजपवर निशाणा साधला. राफेल विमानांची किंमत अचानक का बदलली गेली असा सवाल राहुल गांधींनी विचारला.

राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेतील ठळक मुद्दे :

- नोटाबंदीचे निर्णय घेण्याचे कारण काय होते याची अद्याप माहिती नाही.

- पंतप्रधानांनी नोटाबंदी केली कारण 15-20 उद्योगपतींकडे बेहिशेबी मालमत्ता होती. त्यामुळे त्यांचे हेच लक्ष्य होते.

- काळ्या पैशाला पांढऱ्या पैशात रुपांतरीत केले.

- याचे उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेशातील एका बँकेचे संचालक असलेले अमित शहा यांच्या बँकेतून 700 कोटी रुपये बदलण्यात आले.

- मोदींनी देशाच्या अर्थव्यवस्थेचे वाटोळे केले.

- बड्या उद्योगपतींना फायदा व्हावा यासाठी नोटाबंदी.

- तुम्ही देशावर नोटाबंदीचा मोठा आघात का केला, आपल्या पंतप्रधानांनी नोटबंदी का केली, याचे उत्तर अद्याप कोणाकडे नाही.

- 15 ते 20 उद्योगपतींकडे बँकांचे कर्ज होते, जनतेच्या खिशातून पैसे काढून उद्योगपतींना दिले. - नोटाबंदीच्या काळात अनेक जणांचा काळा पैसा पांढरा झाला.

- गेल्या 70 वर्षांत असे झाले नव्हते ते मोदींनी करून दाखविले, त्यामुळे त्याचे उत्तर त्यांनी द्यायले हवे.

- अनिल अंबानी यांना काँग्रेस पक्षावर बदनामीचा खटला दाखल केला आहे, पण सत्य बदलणार नाही.

- नोटाबंदी चूक नव्हती तर तुमच्यावर झालेला हल्ला, आक्रमण होते. पंतप्रधानांनी चूक नाहीतर हे सर्व मुद्दामच केले.

- मोदी जनतेचा पैसा घेऊन उद्योगपतींना देतात.

- अरुण जेटली पूर्णपणे फसले आहेत.

- अनिल अंबानी 45 हजार कोटींच्या कर्जात आहे.

- 520 कोटींचे राफेल 1600 कोटींवर गेला कसा ?

- मोदी आणि अनिल अंबानी यांनी काय डील केली आहे, याची माहिती द्यावी.

- राफेल डीलवरून पंतप्रधान खोटे बोलत आहेत, असा आरोप राहुल यांनी केला.

- मोदी जेव्हा खोटे बोलतात, तेव्हा आम्ही ते खोटं पकडतो.

- मोदींनी गरिबांचे पैसे उद्योगपतींना दिले.

- अनिल अंबानींच्या नव्या कंपनीला राफेलचे कंत्राट

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com