शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांना दमडीचीही ओवाळणी देऊ नये- राज ठाकरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 8 नोव्हेंबर 2018

मुंबई- शेतकऱ्यांप्रश्नी सरकार गंभीर नसल्याचा वारंवार आरोप करणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्ताधाऱ्यांवर आपल्या व्यंगचित्रातून टीका केली आहे. आज पाडव्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आणखी एक व्यंगचित्र काढले आहे. शेतकरी प्रश्नावर भाष्य करणारे हे व्यंगचित्र आहे. या व्यंगचित्रात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसत आहेत. दोघांनीही स्त्रीचा वेश परिधान केल्याचं दाखवण्यात आले आहे. शिवाय, शेतकरी जोडपेदेखील येथे बसलेले दाखवण्यात आले आहे.  

शेतकऱ्यांची फसवणूक करत त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महाराष्ट्र सरकारला दमडीचीही ओवाळणी शेोतकऱयांनी देऊ नये असे राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रात दाखवले आहे. शेतकऱ्याची बायको शेतकऱ्याला खडसावून सांगत आहे की, आज पाडव्याची एका दमडीचीही ओवाळणी यांना टाकलीत तर याद राखा असे या व्यंगचित्रात दाखवण्यात आले आहे.

दरम्यान, धनत्रयोदशीपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फेसबुक आणि ट्विटर या दोन्ही ठिकाणी त्यांचे व्यंगचित्र पोस्ट करत आहेत. अमित शहा, नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सगळ्यांवर व्यंगचित्र काढून झाल्यावर आता महाराष्ट्र सरकारवर म्हणजेच भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांवर राज ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

संबंधित बातम्या

Saam TV Live