'राष्ट्रवाद' शब्दापासून RSS नं झटकले हात; राष्ट्रीयता शब्दावर संघ देणार भर

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 3 जुलै 2019

राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं चक्क राष्ट्रवाद या शब्दापासूनच हात झटकलेत. संघ आता राष्ट्रीयता या मुद्द्यावर भर देणार आहे. संघ राष्ट्रवादी संघटना नाही, असं खुद्द सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी स्पष्ट केलंय. राष्ट्रवाद या शब्दावरुन संघाच्या स्वयंसेवकांमध्येही गैरसमज असल्याचं म्हणत त्यांनी स्वयंसेवकांना घरचा आहेर दिलाय.

राष्ट्रवाद हा शब्द भारतीय नाही तर परदेशातून आलाय, राष्ट्रवादाच्या नावाखाली पाश्चिमात्य देशात युद्ध लादली गेली, त्यामुळं या शब्दाचा वापर संघाकडून यापुढे करण्यात येणार नाहीये, अशी भूमिका संघाकडून घेण्यात आलीय.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नेहमीच राष्ट्रवादी असल्याचा दावा करतात, राष्ट्रवादाच्या नावानं काँग्रेससह इतर सेक्युलक पक्षांना कानपिचक्या देत असतात. पण आता खुद्द संघानंच राष्ट्रवाद या शब्दापासून हात झटकलेत. राष्ट्रीयता शब्द वापरण्याचं ठरवलंय. आता हा संघाच्या भूमिकेत झालेला १८० डिग्री बदल म्हणायचा की शब्दच्छल याची चर्चा सुरु झालीय.

WebTitle : marathi news politics RSS on use of term rashtrawad 

संबंधित बातम्या

Saam TV Live