लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यास युती पक्की ?

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 22 जानेवारी 2019

मुंबई - शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धार पक्‍का केला असला तरी, लोकसभा आणि विधानसभा एकत्र झाल्यास युती करण्याची त्यांची तयारी असल्याची माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. भाजपनेदेखील निवडणूकपूर्व युती व्हावी, यासाठी निवडणुका एकत्र घेण्याची तयारी सुरू केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नुकतीच याबाबत चर्चा झाली असून, लोकसभेसोबतच विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश मोदी यांनी दिल्याचे सांगण्यात येते. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात जिव्हाळ्याचे संबध असून फडणवीस शिवसेनेला युतीसाठी तयार करतील, असा दावा केला जात आहे.

मात्र, शिवसेना केवळ लोकसभेसाठी युती करण्यास तयार नाही. लोकसभेत युती करून पुन्हा पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी यांना संधी मिळाल्यास त्यानंतर विधानसभेत भाजप शिवसेनेसोबत युती करेल याची कोणतीही खात्री शिवसेनेला नाही. यासाठीच राज्यातील सर्व जिल्हा पदाधिकाऱ्यांना स्वबळाच्या तयारीला लागा, असे आदेश ठाकरे यांनी दिले आहेत. 

दरम्यान, या निवडणुका एकत्र झाल्यास विधानसभेसाठी २०१४ ला शिवसेनेने दिलेले जागावाटपाचे सूत्र भाजप मान्य करेल, असे सूत्रांचे म्हणणे आहे. विधानसभेत युतीला बहुमत मिळाल्यास मुख्यमंत्रिपद अडीच अडीच वर्षे रहावे, कोणत्याही पक्षाला कितीही जागा मिळाल्या तरी मुख्यमंत्रिपदी दोन्ही पक्षांना संधी मिळावी, अशी शिवसेनेने अट घातली तरी भाजप ती मान्य करेल, असा दावा सूत्रांनी केला आहे.

WebTitle : marathi news politics shivsena bjp alliance loksabha and vidhansabha election  

संबंधित बातम्या

Saam TV Live