मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेची 'मन की बात' ; सामनातून शिवसेनेची नमती भूमिका

वैदेही काणेकर, साम टीव्ही, मुंबई
मंगळवार, 9 जुलै 2019

आजवर महापौर आमचाच, मुख्यमंत्री आमचाच अशा गर्जना करणाऱ्या शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदावरनं पहिल्यांदाच मवाळ भूमिका घेतलीय. मुख्यमंत्री कुणाचाही झाली तरी तो आमचाच असेल, दोघांची सत्ता आणणं हेच ध्येय आहे, अशी भूमिका शिवसेनेनं घेतलीय.

शिवसेनंचं मुखपत्र असलेल्या सामनातूनही शिवसेना-भाजप युतीचे गोडवे गाण्यात आलेत. आमच्यात कुरघोडी वगैरे काही नाही. समोर पंचपक्वानांचं ताट वाढलेलं असताना ते उधळण्याचा नतद्रष्टपणा आम्ही करणार नाही, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलंय. युती विजयाचा यापेक्षा दुसरा कोणताही ‘फॉर्म्युला’ असूच शकत नाही, अशाप्रकारची मवाळ भूमिका शिवसेनेकडून घेण्यात आलीय.

एकीकडे भाजपचे नेते मुख्यमंत्री आमचाच म्हणत शिवसेनेला डिवचतायंत, त्याचवेळी कधीकाळी स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेकडून मात्र दिवसेंदिवस मवाळ भूमिका का घेण्यात येतेय, याची चर्चा सुरु झालीय.

WebTitle : marathi news politics shivsena CM of maharashtra samana BJP

संबंधित बातम्या

Saam TV Live