शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर तलवारीने हल्ला

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 13 ऑक्टोबर 2018

अणुशक्ती नगरचे शिवसेना आमदार तुकाराम काते यांच्यावर गुंडांनी तलवारीने हल्ला केलाय. या हल्ल्यात तुकाराम काते थोडक्यात बचावलेत.

तुकाराम काते यांनी मेट्रोच्या गैरकारभारावर मानखुर्द महाराष्ट्र नगर येथे मेट्रोच्या साईटवर मोर्चा काढला होता. त्यानंतर मेट्रोचं काम करणाऱ्या  कंत्राटदारांचे ट्रकही पकडून दिले होते. याचा राग ठेवून मेट्रोच्या कंत्राटदाराने जीवे मारण्यासाठी गुंड पाठवल्याचा आरोप आमदार तुकाराम काते यांनी केलाय.

महाराष्ट्र नगर मधील गरब्याचा कार्यक्रम संपल्यावर तुकाराम काते कार्यकर्त्यांसह बोलत होते. त्याचवेळी काही गुंड हातात तलवारी घेवून तुकाराम काते यांच्या अंगावर धावून आले. मात्र तुकराम काते यांच्या बॉडीगार्डने त्यांना वाचवलं. हल्लेखोरांनी तलवारी आणि हॉकीस्टीकचा धाक दाखवत तिथून पळ काढला. त्यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आलं.

या जीवघेण्या हल्ल्यातून बचावलेले तुकाराम कातेंनी पोलिसात तक्रारही दाखल केलीय. या प्रकरणी आता 5 अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 
WebTitle : marathi news shivsena leader tushar kate attacked in mumbai 

संबंधित बातम्या

Saam TV Live