महाराष्ट्रात शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे आणणार; पंढरपुरात शिवसेनेचं शक्तिप्रदर्शन 

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 24 डिसेंबर 2018

चौकीदारच चोर झाल्याची घणाघाती टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलीय. पंढरपुरातील चंद्रभागेच्या मैदानात झालेल्या विशाल सभेत उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघाती टीका केली. पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या, शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे द्या नाहीतर जागावाटप गेलं खड्ड्यात असा इशाराही त्यांनी दिलाय. सरकारनं विमान घोटाळा केलाय, पीक विम्यातही गोलमाल आहे अशी टीका त्यांनी केलीय. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असा निर्धारही त्यांनी केलाय.

पीकविमा योजनेपासून राफेल विमान खरेदीतील कथित गैरव्यवहारांपर्यंत सर्वच मुद्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कडाडून टीका करत केंद्र आणि राज्यातील सत्तेत भागीदार असलेल्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभेसाठीची 'बार्गेनिंग पॉवर' वाढल्याचेच आजच्या सभेतून दाखवून दिले. 

पंढरपूरमध्ये घेतलेल्या आजच्या शिवसेनेच्या सभेस प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीसमोर केलेल्या भाषणामध्ये पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारांमध्ये कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राफेलवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर जे आरोप केले, तेच आणि तशाच पद्धतीने ठाकरे यांनीही आज मोदींवर टीकास्त्र सोडले. 

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे 

 • पाच राज्यांच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंची मोदी सरकारवर टीका.. शिवसेनेकडून भाजपच्या जखमेवर मीठ 
 • धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणारच - उद्धव ठाकरे 
 • राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच, उद्धव ठाकरेंचा पंढरपुरात पुनरुच्चार 
 • जानेवारीत उद्धव ठाकरेंचा दुष्काळ दौरा, पंढरपुरात उद्धव ठाकरेंची घोषणा
 • कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलोय - उद्धव ठाकरे
 • "हल्ली पहारेकरी चोरी करायला लागलेत",  उद्धव ठाकरेंचा मोदींना चिमटा 
 • केंद्राच्या पथकाने दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा दौरा केला, पण शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार ? 
 • राफेल प्रमाणे देशातील पीक  विमा योजनेत भ्रष्टाचार - उद्धव ठाकरेंचा घणाघात   
 • शिवरायांचा महाराष्ट्र नसती मस्ती खपवून घेणार नाही. - उद्धव  ठाकरे
 • घोटाळयांमध्ये 'क्लिनचीट'घ्या; मात्र आमच्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा - उद्धव ठाकरे
 • नितीश कुमार आणि राम विलास पासवान हे राम मंदिर आणि हिंदुत्ववादावर बोलणार का ? 
 • "बाबरी पडली, होय मी लाभार्थी  अशी एक जाहिरात बनवून घ्या" - उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला 
 • जागावाटपाचा मुद्दा गेला खड्ड्यात, माझ्या शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करून हवाय - उद्धव ठाकरे  
 • महाराष्ट्रातून #दुष्काळ जाईपर्यंत संपूर्ण शालेय फी माफ करा - उद्धव ठाकरे 
 • महाराष्ट्रात शिवसेनेचं राज्य आणणार म्हणजे आणणार - उद्धव ठाकरे 

संबंधित बातम्या

Saam TV Live