Loksabha 2019 : बीड जिल्ह्यात मतदानाला शांततेत सुरवात

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 18 एप्रिल 2019

बीड : भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेच्या केलेल्या बीड लोकसभा मतदार संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १८) सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील २३२५ केंद्रांवर मतदान होत आहे. सकाळी दहा वाजेपर्यंत शांततेत मतदान सुरु होते. 

राज्यात सर्वाधिक ३६ उमेदवार रिंगणात असलेल्या या निवडणुकीत भाजपच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांच्यात सरळ लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीकडून प्रा. विष्णु जाधव रिंगणात आहेत. २० लाख ४१ हजार १८१ मतदार असलेल्या मतदार संघात पहिल्या तीन तासांत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. केवळ महिला कर्मचारी असलेले सखी मतदान केंद्र आणि केवळ दिव्यांग कर्मचारी असलेले स्वावलंबी मतदान केंद्र हे वेगळे वैशिष्ट्य आहे. मतदान प्रक्रीयेसाठी साडेनऊ हजारांवर कर्मचारी आणि तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मतदान प्रक्रीयेवर नजर ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रुम तयार केली असून जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे या रुममधून प्रक्रीयेवर लक्ष ठेवून आहेत.

Web Title: Marathi news polling starts for loksabha election in Beed constituency

संबंधित बातम्या

Saam TV Live