गांधीजींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडणारी हिंदू महासभेची पूजा पांडे अलिगडमधून अटकेत

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 6 फेब्रुवारी 2019

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्याला, पुण्यतिथी दिनी हिंदू महासभेने गोळ्या घातल्याच्या घटनेने खळबळ उडाली होती. याप्रकरणी हिंदू महासभेची राष्ट्रीय सरचिटणीस पूजा पांडे आणि तिचा पती अशोक पांडे या दोघांना अलिगढ पोलिसांनी ताब्यात घेतलंय.

गांधीजींच्या पुण्यतिथीदिनी 30 जानेवारी रोजी हा प्रकार घडला होता. याच दिवशी 1948 साली नथुराम गोडसेने महात्मा गांधींची गोळी झाडून हत्या केली होती. हा सगळा प्रकार अत्यंत विकृतपणे करण्यात आला होता. हे कृत्य केल्यानंतर पांडेने महासभेच्या सदस्य आणि समर्थकांना मिठाई देखील वाटली. हिंदू महासभेच्या या कृत्याचा देशातील सर्वच स्तरातून निषेध करण्यात आला होता.

WebTitle : marathi news pooja pande who shot statue of mahatma gandhi under arrest 

संबंधित बातम्या

Saam TV Live