'आम आदमी पार्टी'ला त्यांच्याच राज्यात लाजीरवाणा पराभव

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 23 मे 2019

लोकसभा निकाल 2019 : नवी दिल्ली : चार वर्षांपूर्वी मोठ्या मताधिक्‍याने ऐतिहासिक विजय मिळविणाऱ्या 'आम आदमी पार्टी'ला (आप) त्यांच्याच राज्यात लाजीरवाणा पराभव स्वीकारावा लागला. दिल्लीतील सातपैकी एकाही जागेवर 'आप'ला विजय मिळविता आलेला नाही. दिल्लीतीत सर्व सातही जागांवर भाजपच आघाडीवर आहे. 

विशेष म्हणजे, सातपैकी केवळ दोनच जागांवर 'आप'चे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अन्यथा, दिल्लीतील मुख्य चुरस भाजप आणि कॉंग्रेसमध्येच आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार गौतम गंभीरने राजकीय पदार्पणातच विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. त्याने कॉंग्रेसच्या अरविंदरसिंग लव्हली यांच्यावर अडीच लाखांहून अधिक मतांनी आघाडी घेतली आहे. दिल्लीमध्ये सर्वांत कमी आघाडी केंद्रीय मंत्री हर्ष वर्धन यांना मिळाली आहे. हर्ष वर्धन यांना 89 हजार मतांची आघाडी मिळाली आहे. 

दिल्लीतील जागा जिंकून पुन्हा एकदा आव्हानवीर ठरण्याच्या 'आप'च्या स्वप्नाला यंदा जोरदार धक्का बसला आहे. 

Web Title: Poor performance by AAP in Lok Sabha 2019 as BJP clean sweaps Delhi

संबंधित बातम्या

Saam TV Live