पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियलचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीतला एक खळबळजनक खुलासा

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 19 सप्टेंबर 2018

वॉशिंग्टन : अमेरिकेतील पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल हिने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत खळबळजनक खुलासा केला आहे. तिने आपल्या नव्या पुस्तकात असे म्हटले आहे, की इतर लोकांसोबत संबंध ठेवल्यावर जे समाधान मिळायचे ते डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत मिळत नसायचे.

डॅनियलच्या नव्या पुस्तकाचे नाव 'फुल डिस्कलोजर' असे आहे. डॅनियल ने 2007 मध्ये ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या संबंधांचा या पुस्तकात खुलासा केला आहे. तिने या पुस्तकात तिने डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबतीतल्या काही खासगी गोष्टींचा उल्लेखही प्रामुख्याने केला आहे.

दरम्यान, यापूर्वीही डॉनियलने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप केलेले आहेत. एका टेलिव्हिजन कार्यक्रमात ट्रम्प यांच्यासोबत असलेले संबंधांविषयी खुलासा न करण्याविषयी त्यांच्यावर दबाव टाकण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी एका व्यक्तीने जबरदस्ती केल्याचेही तिने सांगितले होते. या संबंधांबाबत खुलासा करु नये म्हणून तिला 1 लाख 30 हजार डॉलर्स दिल्याचेही तिने कबूल केले होते. तिने हे पैसे घरच्यांच्या सुरक्षेपोटी आणि काळजीपोटी घेतले असल्याचे तिने सांगितले होते.

Web Title: marathi news porn star stormy daniel on sex with donald trump 

संबंधित बातम्या

Saam TV Live