चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

12 वर्षाखालील चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. देशभरात अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात केलीय.

12 वर्षाखालील चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पॉस्को कायद्यात बदल करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आलीय. देशभरात अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने पॉस्को कायद्यात बदल करण्यास सुरुवात केलीय. केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन चिमुरड्यांवर होणाऱ्या बलात्कारासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान केंद्र सरकारने लिखीत उत्तर देत चिमुरड्यांसोबत बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यासाठी  पॉस्को कायद्यात बदल करण्यात येणार आल्याचं सांगण्यात आलंय. गेल्या अनेक वर्षांपासून चिमुरड्यांवर बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी होतेय. सर्वोच्च न्यायालय याबाबत 27 एप्रिलला पुढील सुनावणी करणार आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live