जितकी भयंकर महामारी तेवढीच कसून भारताची तयारी 

मोहिनी सोनार
सोमवार, 30 मार्च 2020

पुढील काळात कोरोनाचा आणखी वाढायची शक्यता दिसताच ही तयारी सुरू करण्यात आलीय. आपलीही परिस्थिती इटली, अमेरिका आणि ब्रिटनसारखी होऊ नये म्हणून सरकार सज्ज आहे.

 

करोना व्हायरसमुळे सर्वांचेच जीव टांगणीला लागलेत. त्यातच दिवसेंदिवस रुग्णांचा वाढता आकडा पाहून प्रशासन चांगलंच हदरलंय. त्यामुळे भारत सरकारकडून तेवढीच भक्कम तयारी केली जातेय. सरकारी दवाखान्यांसह खासगी दवाखान्यांमध्येही रुग्णांवर उपचार केले जाणारेत. त्यामुळे सर्वांनीच आपल्या परीने जोरदार तयारी केलीय. 

खासगी दवाखान्यांमध्ये आतापासूनच वॉर्ड तयार करण्यात येतायत.

 पुढील काळात कोरोनाचा आणखी वाढायची शक्यता दिसताच ही तयारी सुरू करण्यात आलीय. आपलीही परिस्थिती इटली, अमेरिका आणि ब्रिटनसारखी होऊ नये म्हणून सरकार सज्ज आहे. त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये हवी ती यंत्रणा कार्यान्वित करण्यात येतेय. जसे की आयसोलेशन वॉर्ड. या वॉर्डमध्ये सर्व प्रकारच्या सोयी आहेत. एखादा पेशंट सिरीयस असेल तर त्याच्यासाठी व्हेंटिलेटरसारख्या सोयी उपलब्ध केल्या जातायत. 

 रुग्णांना पूर्णपणे बरं करता यावं यासाठी डॉक्टरांची मोठी टीम अगदी तयार आहे. त्यामुळे लोकांनी घरण्याचं कारण नाही. ते बरे होऊ शकतात आणि शिवाय काही पेशंट बरे होऊन घरीही गेले आहेत. 

 

कोरोनावर अजून कोणतंही औषध नसताना रुग्ण बरे होतात कसे? वाचा...

 अशाप्रकारे प्रशासन पूर्णपणे काळजी घेतंय. फक्त तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि घराबाहेर पडू नका. गर्दीत जाऊ नका. हवे ते सगळेच प्रिकोशन्स घ्या. याच गोष्टी तुमचा आणि तूमच्याबरोबर इतरांचाही जीव वाचवायला मदत करतील. त्यामुळे सतर्क राहा, घरात राहा

Web Title - marathi news positive news about corona. private hospitals are ready for corona 


संबंधित बातम्या

Saam TV Live