...यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा वाढण्याची शक्यता

साम टीव्ही न्यूज
सोमवार, 13 एप्रिल 2020

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात गडगडलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण, ओपॅक देश आणि रशियात तेलाच्या किंमतींवर तह झालाय.

आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणात गडगडलेल्या कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण, ओपॅक देश आणि रशियात तेलाच्या किंमतींवर तह झालाय.

पाहा सविस्तर व्हिडीओ नेमकं कशामुळे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढणार आहेत...

यामध्ये कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्यावर सहमती झालीय. कुवैतचे इंधनमंत्री खालिद अल फदेल यांनी ट्वीट करुन ही माहीती दिलीय. १ मेपासून हे सर्व देश दररोज १ कोटी बॅरलची तेलकपात कऱणार आहे.

तरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर नियंत्रणात राहण्यास मदत होईल. रशिया आणि सौदी अरेबियात गेल्या अनेक वर्षांपासून सुरु असलेला तेल वाद कोरोनाच्या फटक्यानं धूवुन निघालाय. कच्च्या तेलाच्या किंमती पडल्यानं या दोन्ही देशांना अखेर तह करावा लागलाय.

Web Title - the possibility of petrol-diesel prices rising again

संबंधित बातम्या

Saam TV Live