नांदेड : खड्ड्यांमुळे महिलेची रस्त्यावर प्रसूती..  

सकाळ न्यूज नेटवर्क
शनिवार, 28 जुलै 2018

खड्यांमुळे महिलेची रस्त्यावरच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना नांदेडमध्ये घडलीय. इथल्या हदगावमध्ये माहेरी बाळंतपणासाठी आलेल्या रेखा ससाणे हिला प्रसूतीपूर्व कळा येऊ लागल्या, त्यामुळे तिचं कुटुंबिय तिला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रिक्षाने निघाले. मात्र, रस्त्यावरील खड्यांमुळे रेखाला त्रास होऊ लागला आणि वायफना फाट्याजवळ रिक्षा थांबवून डॉक्टरांना बोलवण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी घटनास्थळी धाव घेत तिची प्रसूती केली. रेखाने एका मुलीला जन्म दिला असून बाळ बाळंतीण सुखरुप आहेत. मात्र रस्त्यावरच्या खड्यांमुळे रेखा आणि तीच्या कुटूंबियांचा जिव टांगणीला लागला होता.

WebTitle : marathi news potholes nanded delivery on road 

Tags

संबंधित बातम्या

Saam TV Live