कोंबड्यांची उपासमार.. पोल्ट्री खाद्य वाहतुकीला वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा फटका

कोंबड्यांची उपासमार.. पोल्ट्री खाद्य वाहतुकीला वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा फटका

वाहतूकदारांच्या देशव्यापी संपाचा पोल्ट्री खाद्य वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. खासकरून, खाद्यासाठी लागणाऱ्या सोया ढेपेच्या गाड्या फीडमीलपर्यंत पोहचू न शकल्यामुळे खाद्यटंचाई निर्माण झाली आहे. 

अनेक पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांची उपासमार सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे. गेल्या सात दिवसांपासून वाहतूकदारांचा संप सुरू आहे. सुरवातीचे चार दिवस संपाचा फटका बसला नाही. मात्र, त्यानंतर सोया ढेपेच्या गाड्या येणे बंद झाल्यामुळे खाद्यनिमिर्ती कारखान्यांची चाके थंडावली आहेत.

या संदर्भात, पुणे येथील ओम चिक्स इंडिया कंपनीचे चेअरमन राजेंद्र थोरात म्हणाले, की पोल्ट्री खाद्यात मका आणि सोयामील यांचा 80 टक्के वाटा असतो. त्यातील मका स्थानिक पातळीवर उपलब्ध होवू शकतो, मात्र सोया ढेप ही इंदूर किंवा धुळ्यासारख्या लांबवरच्या प्रोसेसिंग प्लांटवरून येत असते. सध्या हे चक्र ढप्प झाले असून, संप मिटल्यानंतही पुढील पाच दिवसांत खाद्याची मोठी चणचण भासणार आहे.

WebTitle : marathi news poultry business tucker strike maharashtra  

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com