आमचाही ‘वंदे मातरम्‌’ला विरोध' - अॅड. प्रकाश आंबेडकर 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

परभणी - ‘‘वंदे मातरम्‌’ला ‘एमआयएम’चा विरोध आहे तसा आमचाही आहे. मात्र, राष्ट्रगीताचा आम्हीच काय संपूर्ण देश सन्मान करतो. एक राष्ट्रगीत असताना अन्य गीताचा अट्टहास का, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.  

परभणी - ‘‘वंदे मातरम्‌’ला ‘एमआयएम’चा विरोध आहे तसा आमचाही आहे. मात्र, राष्ट्रगीताचा आम्हीच काय संपूर्ण देश सन्मान करतो. एक राष्ट्रगीत असताना अन्य गीताचा अट्टहास का, असा सवाल भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला.  

लालसेना आयोजित सत्ता संपादन परिषदेनिमित्त आंबेडकर आज येथे आले होते.‘‘वंचित बहुजन आघाडीला लहान ओबीसी वर्गाचा पाठिंबा वाढत आहे. आगामी निवडणुकांत काँग्रेसचा ‘एमआयएम’ला अप्रत्यक्षरीत्या विरोध आहे. बहुजन वंचित आघाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे विधानसभेच्या ५० जागा या वर्गाला दिल्या जाणार आहेत.’’ 

या निर्णयाचे स्वागत करण्याऐवजी एका राष्ट्रीय पक्षाकडून हीन पातळीवर टीका केली जात आहे. आम्ही घेतलेल्या औरंगाबादच्या मेळाव्यानंतर शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून हिडीस वृत्ती दाखवण्यात आली, त्याचा निषेध करतो, असेही आंबेडकर म्हणाले.

एल्गार परिषदेनंतर मराठा आणि ओबीसी समाजात वाढलेल्या दरीला भाजपकडून खतपाणी घातले जात असल्याचा आरोप आंबेडकर यांनी  केला. जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, या ओबीसींच्या मागणीला ‘भारिप’चा पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले.

‘एमआयएम’शी मैत्री तोडणार नाही 
काँग्रेससोबतच्या आघाडीबाबत बहुजन वंचित आघाडीची केवळ एकच बैठक झाली आहे. मात्र, त्यांनी ‘एमआयएम’ला अप्रत्यक्षरीत्या विरोध दर्शवला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने अद्याप यावर निर्णय दिला नाही. त्यामुळे राज्यातील नेतृत्वाकडून बोलणी थांबली आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष सोबत आला किंवा नाही आला तरी ‘एमआयएम’शी मैत्री तोडणार नाही, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.


संबंधित बातम्या

Saam TV Live