आंबेडकर यांच्या महाआघाडीतील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 14 फेब्रुवारी 2019

सत्ताधारी भाजपला लोळवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. सर्वच विरोधकांना सोबत घेत विरोधकांची मोट बांधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे. मात्र विरोधकांच्या या प्रयत्नांना निवडणूकीपूर्वीच धक्का बसण्याची शक्यता आहे. 

भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या महाआघाडीतील समावेशाबाबत प्रश्नचिन्ह कायम आहे. राष्ट्रवादीने लोकसभेसाठी भारिपला 4 जागा देऊ केल्या आहेत. मात्र प्रकाश आंबेडकर 12 जागांवर ठाम असून, जोवर आश्वासन मिळत नाही तोवर त्यांनी एनसीपीच्या बैठकीकडे देखील पाठ फिरवण्याचं ठरवलं आहे.

राजू शेट्टीदेखील महाआघाडीबाबत उदासीन

केवळ प्रकाश आंबेडकरच नव्हे, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टीदेखील महाआघाडीबाबत उदासीन असल्याचं वारंवार समोर आलंय. त्यामुळे, विरोधकांची एकजूट कायम राखण्याचं आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर असणार आहे. 

संबंधित बातम्या

Saam TV Live