आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफ प्रोजेक्टला प्रकाश आंबेडकारांचा पाठिंबा

साम टीव्ही न्यूज
शनिवार, 18 जानेवारी 2020

पुणे  :  राज्यातील केवळ मुंबईच नव्हे सर्वच महानगरांमध्ये 'नाइट लाइफ' ची आवश्यकता असल्याचे मत वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१८) पुण्यात बोलताना व्यक्त केले. मी स्वत: हे सर्व आयुष्य जगलोय, उपभोगले आणि अनुभवले असल्याने, मी या नाइट लाइफच्या बाजूने असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

पुणे  :  राज्यातील केवळ मुंबईच नव्हे सर्वच महानगरांमध्ये 'नाइट लाइफ' ची आवश्यकता असल्याचे मत वंचित विकास आघाडीचे अध्यक्ष आणि माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी (ता.१८) पुण्यात बोलताना व्यक्त केले. मी स्वत: हे सर्व आयुष्य जगलोय, उपभोगले आणि अनुभवले असल्याने, मी या नाइट लाइफच्या बाजूने असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

महानगरी मुंबईत नाइटलाइफ सुरू व्हावे म्हणून गेली काही वर्षे आग्रही असणारे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी २६ जानेवारीपासून तीन ठिकाणी याचा प्रयोग राबविणार असल्याची घोषणा शुक्रवारी केली. नरिमन पॉइंट, काळा घोडा, वांद्रे-कुर्ला संकुल अशा अनिवासी क्षेत्रातून याची सुरुवात होईल. या भागातील मॉल, दुकाने, हॉटेल्स २४ तास खुली ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मुंबई महापालिकेमार्फत आयोजित ‘स्वच्छता सर्वेक्षण २०२०’ या स्पर्धेच्या पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती. 

नाइटलाइफसाठी सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात येणार असून उपक्रमाचे यश पाहून व्याप्ती वाढविण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. अनिवासी क्षेत्रात सुरू होणाऱ्या या उपक्रमामुळे नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नसल्याचे ते म्हणाले. मुंबईआधी अहमदाबाद शहरात नाइटलाइफ सुरू आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मुंबई शहर मागे राहावे असे वाटतेय का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होता. आणि यावरुनच आता आंबेडकरांनीही यास पाठिंबा दिलाय.

राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी काय निर्णय घेतला हे माहित नाही. त्यामुळे त्यांच्या निर्णयाला पाठिंबा आहे, असे समजू नका. केवळ मी नाइट लाइफच्या बाजूने आहे, असे म्हणत त्यांचा  ठाकरे यांच्या नाइट लाइफच्या  निर्णयाला अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचे ही यावेळी स्पष्ट झाले. ते म्हणाले, "राज्यातील महानगरांमध्ये रोजगार आणि नोकरीच्या निमित्ताने अनेक नागरिक येत असतात. त्यापैकी अनेकांना रात्रपाळीत काम करावे लागते. त्यांच्यासाठी नाईट लाईफ आवश्यक आहे.


संबंधित बातम्या

Saam TV Live