CAA आणि NRC विरोधात आंबेडकरांच्या भारिप संघाकडून धरणे आंदोलन

CAA आणि NRC विरोधात आंबेडकरांच्या भारिप संघाकडून धरणे आंदोलन

CAA आणि NRC विरोधात मुंबई प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघाने धरणं आंदोलन सुरू केलंय. पोलिसांकडून या आंदोलनाला परवानगी नसतानाही आंदोलन सुरू करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांवर प्रकाश आंबेडकर यांनी हल्लाबोल केलाय. राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी देशभरात लागू करणार नाही, असं पंतप्रधान सभेत म्हणाले. मग गृहमंत्री अमित शहा लोकसभेत एनसीआर लागू करणार असल्याची घोषणा कशी करतात? असा खडा सवाल आंबेडकरांनी विचारलाय. भाजपा आणि संघाचं राजकारण खोटारडेपणावर चालत असल्याचा आरोपही त्यांनी केला. यावेळी सर्व आंदोलनकर्त्ंयांकडून जोरदार घोषणाबाजी करणाय्त आलीय. 

काय म्हणाले प्रकाश आंबेडकर?

एनआरसी-सीएएला आमचा विरोध आहे. मुंबईत 70 टक्के नागरिक शहराबाहेरील, बाहेरच्या राज्यातील आहेत. कोणाकडेही वाडवडिलांचे पुरावे मिळणार नाहीत. त्यांच्या तीन-चार पिढ्या मुंबईत गेल्या आहेत. गाव, तालुका कुठला यांची माहिती नाही. आपले आजोबा-पणजोबा कुठे आणि कधी जन्मले, याचे पुरावे नाहीत, मग ते कागदपत्रं कशी सादर करणार? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी केलाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, की एनआरसी देशभरात लागू करण्याबाबत निर्णय झालाच नाही, पण हे साफ खोटं आहे. कर्नाटकात छावण्या (डिटेंशन सेंटर) बांधण्यात आल्याचे फोटो आणि वृत्त मी वाचलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. आपल्या विचारधारेमुळे आपण फार काळ टिकू शकणार नाही, हे संघाला माहित आहे. संघ आणि भाजपला खोटं बोलण्याचा इतिहास असल्याचा घणाघात आंबेडकरांनी केलाय.

Web Title - Prakash Ambedkar's agitation against CAA and NRC

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com