प्रणव मुखर्जी RSS च्या संघशिक्षा वर्गाच्या समारोपावेळी काय बोलणार ? 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 7 जून 2018

नागपुरात आरएसएसच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाचा समारोप होतोय. या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रणव मुखर्जी यांना संघाच्या निमंत्रणावरून नवा वाद निर्माण झालाय. कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी मुखर्जी यांच्या संघातील उपस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यानंतरही मुखर्जींनी संघाचं निमंत्रण स्विकारलंय. त्यामुळं ते काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे.. 

दरम्यान, नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला जाऊन तुम्ही भाजपवाल्यांना खोट्या बातम्या आणि अफवा पसरवण्याची संधी दिली आहे. ही तर फक्त सुरुवात आहे, असं म्हणत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर त्यांच्याच मुलीने निशाणा साधला आहे. शर्मिष्ठा मुखर्जी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वृत्ताचं खंडन करत असा आपला कोणताही विचार नसल्याचं शर्मिष्ठा मुखर्जी यांनी स्पष्ट केलं. शिवाय प्रणवदांच्या नागपूर भेटीमुळेच या अफवा पसरवल्या जात असल्याचं म्हणत त्यांनी वडिलांवरच निशाणा साधला.

संबंधित बातम्या

Saam TV Live