स्वस्थ राहायचंय? मग हे प्राणायाम नक्की करा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

तंदुरुस्त राहण्यासाठी नागरिक नेहमी वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यापैकीच एक म्हणजे प्राणायाम! सोलापुरातील हराळी प्लॉट, योगासन मंडळाचे सदस्य दररोज सकाळी एक ते दोन तास बागेत येऊन प्राणायाम करतात. 

तंदुरुस्त राहण्यासाठी नागरिक नेहमी वेगवेगळे प्रयत्न करतात. त्यापैकीच एक म्हणजे प्राणायाम! सोलापुरातील हराळी प्लॉट, योगासन मंडळाचे सदस्य दररोज सकाळी एक ते दोन तास बागेत येऊन प्राणायाम करतात. 

प्राणायामाचे फायदे : 
भस्त्रिका प्राणायाम : भस्त्रिका प्राणायाममुळे रक्त शुद्ध होते, हृदय-फुफ्फुसे मजबूत होतात. दमा-अस्थमा-हायपरटेन्शनमध्ये लाभ होतो. सर्दी-खोकला कमी होतो. कोणत्याही प्रकारची ऍलर्जी होत नाही. श्‍वासाचे रोग, साइनस यासारखे रोग पूर्णपणे बरे होतात. मन स्थिर राहते. 
 
कपालभारती प्राणायाम : कपालभारती प्राणायाममुळे मधुमेह बरा होतो. उंचीच्या प्रमाणातच वजन नियंत्रित राहते. पोटाचे सर्व विकार दूर होतात. गॅस-बद्धकोष्ठता-अपचन दूर होते. लिव्हर-किडनी-प्रोस्टेटसंबंधी सर्व रोग दूर होतात. चेहऱ्यावर तेज येते, सौंदर्य वाढते, सर्व कफरोग नाहीसे होतात. हृदयरोग नाहीसे होतात. तसेच जाडी, आम्लपीत यासंबंधी रोग दूर होतात. पोटावरची चरबी कमी होते. हृदयाच्या शिरामध्ये आलेले ब्लॉकेज कमी होतात. डिप्रेशनसारख्या रोगापासून मुक्तता होते. हा प्राणायाम म्हणजे पृथ्वीवरची संजीवनी आहे. 

बाहय प्राणायाम : बाहय प्राणायामामुळे पंचप्राण सप्तचक्र कार्यान्वित होते. पोटाच्या सर्व विकारावर लाभदायक आहे. बुद्धी तीव्र होते. यामुळे मूळव्याध कमी होतो. 

उज्जायी प्राणायाम : उज्जायी प्राणायामामुळे टॉन्सिल, थायरॉईडमध्ये लाभ होतो, घशाचे सर्व विकार दूर होतात, झोपेत घोरण्याची सवय बंद होते. आत्मविश्‍वास खूप वाढतो. मनाची एकाग्रता वाढते. मानसिक ताण, निद्रानाश या आजारापासून मुक्तता मिळते. 

अनुलोम विलोम प्राणायाम : अनुलोम विलोम या प्राणायामामुळे आपल्या शरीरातील 72 करोड 72 लाख 10 हजार 210 नाड्या शुद्ध होतात. हृदयाच्या धमणीमध्ये साचलेली अवरोध मोकळी होतात. मेंदूला शुद्ध वायूपुरवठा होतो. मेंदूचे विकार दूर होतात. शरीरावर आलेली गाठ विरघळते. कफ-आम्लपित्त-धातूरोग-शुक्रक्षय आदी रोग दूर होतात. डोळ्याचे आरोग्य वाढविणारा व चष्म्याचा नंबर पूर्णपणे घालवणारा हा प्राणायाम आहे. 

भ्रामरी प्राणायाम : भ्रामरी प्राणायामामुळे मन एकाग्र होते. स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. मेंदूच्या विकारावर प्रभावी आणि मानसिक ताण कमी होतो. उच्चदाब-हृदयरोग यावर अत्यंत उपयुक्त असे प्राणायाम आहे. 

उदगीत प्राणायाम : उदगीत प्राणायामामुळे मनातील वाईट विचार निघून जातात. वाईट स्वप्ने पडणे बंद होतात. झोप शांत लागते. 

तंदुरुस्त राहण्यासाठी 
प्रत्येक वयोगटातील व्यक्तीने प्राणायाम केले पाहिजे. स्वत: तंदुरुस्त राहण्यासाठी वेळ काढून प्राणायाम करावे. प्राणायाम केल्यामुळे शांत झोप लागते. दिवस आनंदी जातो, आळस कमी होतो म्हणून उपाशीपोटी नियमित प्राणायाम केलेच पाहिजे. 
- शशिकांत पुकाळे, 
पतंजली युवक समिती, योग प्रशिक्षक
 

प्राणायामाचे प्रकार 

  • भस्त्रिका प्राणायाम 
  • कपालभारती प्राणायाम 
  • बाहय प्राणायाम
  • उज्जायी प्राणायाम 
  • अनुलोम विलोम प्राणायाम
  • भ्रामरी प्राणायाम
  • उदगीत प्राणायाम
  • प्रणव

 

Web Title: Pranayama of Harali plot for health


संबंधित बातम्या

Saam TV Live