सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार; प्रणिती शिंदेंचा हल्लाबोल कुणावर? 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 26 ऑक्टोबर 2018

सोलापूरचे दोन मंत्री आणि बेवडा खासदार... नाईलाजाने हा शब्दप्रयोग करावा लागत आहे, असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शाब्दीक हल्ला चढविला.

निमित्त होते प्रभाग सोळामध्ये आयोजिलेल्या विविध विकासकामांच्या भूमीपूजन कार्यक्रमाचे. 

खासदार बनसोडे यांनी चपळगावात केलेले वक्तव्य आणि काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक साळुंके यांचे कथित वक्तव्य चर्चेत असतानाच आमदार शिंदे यांचाही तोल सुटल्याची चर्चा रंगली आहे. 

नगरसेविका फिरदोस पटेल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. नगरोत्थान योजनेतून होणाऱ्या विविध कामांचे भूमीपूजन यावेळी करण्यात आले. यावेळी नगरसेवक बाबा मिस्त्री, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, माजी महापौर नलिनी चंदेले, शौकत पठाण यांची उपस्थित होती.

आमदार शिंदे म्हणाल्या,"भाजप सरकार आल्यापासून गोरगरीबांची अडचण झाली आहे. कॉंग्रेसने सुरु केलेल्या प्रकल्पांची उद्‌घाटने करणे व त्याचे श्रेय घेणे इतकेच काम त्यांच्याकडून सुरु आहे. दोन मंत्र्यांचे एकच काम, भांडणे करा, एकमेकांचे गट सांभाळा एवढेच त्यांचे काम आहे. आयत्या बिळात नागोबा हीच त्यांची भूमिका आहे.'' 

संबंधित बातम्या

Saam TV Live