विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकरांची निवड

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 16 डिसेंबर 2019

विधानपरिषदेच्या विरोधीपक्षनेतेपदी प्रविण दरेकरांची निवड झाली. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रविण दरेकर यांच्या नावाची घोषणा केली. प्रविण दरेकरांनी आमदार सुरजितसिंह ठाकूर, भाई गिरकर यांना मागे टाकत विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेतेपद मिळवले.
शिवसेनेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या दरेकरांनी. राज ठाकरेंसह मनसेमध्ये दशकभर काम केलं. त्यानंतर 2014मध्ये विधानसभा पराभवानंतर दरेकरांनी मनसेला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला... 

नागपूरमध्ये आजपासून हिवाळी अधिवेशनाला सुरवात होत असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकासाआघाडी सरकारची कसोटी लागणार आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सरकारला स्थगिती सरकार असे म्हटले आहे. आता विधान परिषदेत सरकारला घेरण्याची भाजपने तयारी सुरु केली असून, दरेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदार सरकारवर टीका करताना दिसणार आहे.

सुरजीतसिंह ठाकुर यांच्या नावाला पक्षाचे अध्यक्ष अमित शाह यांनी संमती दिल्याचे सांगण्यात येत होते. पण, अचानक दरेकर यांचे नाव पुढे आले. विरोधी पक्षनेत्याची घोषणा दोन दिवसांपूर्वीच होणार होती. मात्र, पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा परळीतील मेळावा. त्याची राज्यभर झालेली चर्चा यामुळे निवडीचा विषय मागे पडला होता. आता ही निवड झाली आहे.

Web Title - Praveen Darekar as Leader of Opposition in the Legislative Council

संबंधित बातम्या

Saam TV Live