पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका करणाऱ्या शिक्षकाला ताईंच्या समर्थकांची मारहाण

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 सप्टेंबर 2018

भाजप नेत्यांची गुंडगिरी सुरूच आहे. प्रीतम मुंडेंच्या समर्थकांनी एका शिक्षकाला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. भितीपोटी या शिक्षकानं माफी देखील मागितलीय. राम कदम यांची पाठराखण केली म्हणून शिक्षक संजय कुऱ्हाडे यांनी पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांच्यावर टीका केली होती.

त्यानंतर प्रीतम समर्थकांनी कुऱ्हाडे यांच्या घरी जाऊन त्यांना शिवीगाळ आणि मारहाण करत माफी मागायला लावली. दरम्यान  शिक्षक संजय कुऱ्हाडे यांनी प्रीतम मुंडेंबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरली म्हणूनच शिक्षकाला मारहाण केल्याचा आरोप प्रीतम समर्थकांनी केलाय. दुसरीकडे या प्रकरणी राष्ट्रवादीनं तीव्र संताप व्यक्त केलाय. अशा प्रकारे एका शिक्षकाला मारहाण करणं म्हणजे गुंडगिरीचा कळस गाठल्याची टीका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलीय.
 
संबंधित बातम्या

Saam TV Live